सेल्स किंवा मराठी मध्ये बोललो तर विक्री हा शब्द लोकांना तितकासा सकारात्मक वाटतं नाही, विक्री लोकांना आवडत नाही पण आजू बाजूला बघितले तर सर्व जण विक्री च करत आहेत.
1.मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा मला सायकल घ्यायची होती व वडिलांकडे तसा आग्रह धरला पण सुरवातीला त्यांनी नकार दिला पण मी सांगत गेलो कशा प्रकारे सायकल माझा शाळेतून घरी यायचा वेळ वाचवेल, कशा प्रकारे मी घरी लागणाऱ्या छोट्या वस्तू बाजारातून लवकर आणून देईल इत्यादी आणि शेवटी त्यांनी मला सायकल घेऊन देईल, इथे मी माझा हट्ट विकला.
2. लग्न करता वेळेस मुली कडील मुलीच्या चांगल्या बाजू मांडतात, मुलाकडील मुलाच्या चांगल्या बाजू मांडतात, आम्ही चांगले आहोत हे एखाद्याला पटवून देणे हे पण एक प्रकारची विक्री च आहे.
3. जॉब इंटरव्ह्यू मध्ये मी किती बेस्ट आहे तुमच्या कंपनी साठी हे पटवून सांगणे हा पण एक सेल्स चा च प्रकार आहे.
4. वकील त्याच्या क्लायंट ची जेंव्हा बाजू मांडतो तो पण एक प्रकारचे सेल्स च आहे.
सांगायचा मुद्दा, या जगात प्रत्येक जण वेग वेगळ्या रूपात सेल्स करत आहे.
सेल्स माणसाचे आयुष्य समृद्ध करते, सेल्स मुळे रोजगार मिळतो, सेल्स मुळे आर्थिक दृष्ट्या माणूस संपन्न होतो, सेल्स मुळे अनेक कुटुंबाला आर्थिक आधार मिळतो
थोडक्यात चांगल्या मार्गाने केलेला सेल्स कधीच वाईट नसतो, सेल्स म्हणजे आर्थिक व समृद्ध आयुष्याकडे घेऊन जाणारे वाहन आहे.